तुम्ही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या आणि वाचल्या असतील, ज्यामध्ये प्रियकराने प्रेयसीच्या लग्नात जबरदस्तीने प्रवेश केला. पण हे केवळ आपल्या सामान्य लोकांच्या आयुष्यात नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही घडते. अमेरिकी सिंगर ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात हे घडले होते. ब्रिटनी स्पीयर्स ९ जून रोजी होणारा पती सॅम असगरीसोबत लग्न करणार होती. लग्नाची सर्व तयारी देखील झाली होती. एवढंच काय तर ब्रिटनी आणि तिचा होणारा पती लग्नाच्या ठिकाणीही पोहोचले होते. पण त्यांच्या लग्नात पूर्वाश्रमीचा पती जेसन अलेक्झँडरने गोंधळ घातला. जेसन अलेक्झांडरने ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नाच्या काही तास आधी, जेसनने पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या कॅलिफोर्नियातील घरात प्रवेश केला. जेसनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येऊन याबद्दल सांगितले आणि मग तो थेट ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नाच्या ठिकाणी गेला. लाईव्हमध्ये, जेसन सुरक्षा रक्षकांना सांगताना दिसत आहे की ब्रिटनी स्पीयर्सने तिला तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. जेव्हा गार्ड्स जेसनला खूप प्रयत्न करूनही आत जाऊ देत नाहीत, तेव्हा तो ब्रिटनीच्या लग्नाच्या हॉलमध्ये जबरदस्तीने घुसण्याची धमकी देतो.

आणखी वाचा : चिमुकलीची शिवभक्ती पाहून ऊर भरून येईल! डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ची कहाणी खोटी म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहंना, विवेक अग्निहोत्रीने दिले उत्तर

टीएमझेडच्या रिपोर्टनुसार, जेसन अलेक्झांडरचे सुरक्षा रक्षकांशी भांडण झाले आणि त्याने ब्रिटनी माझी पहिली पत्नी असल्याचे ओरडण्यास सुरुवात केली. मी तिचा पहिला पती आहे. मी इथे तिच्या लग्नासाठी आलो आहे. जेसन आणि ब्रिटनी स्पीयर्सचे २००४ मध्ये लग्न झाले आणि हे लग्न केवळ ५५ तास टिकले. जेसननंतर, ब्रिटनी स्पीयर्सने त्याच वर्षी केविन फेडरलाइनशी लग्न केले, परंतु २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

ब्रिटनी स्पीयर्स गेल्या ६ वर्षांपासून सॅम असगरीला डेट करत होती. दोघांचे ९ जून रोजी लग्न झाले, ज्यामध्ये ब्रिटनीच्या पूर्वाश्रमीच्या हुज्जत घातली. पण कसेबसे ब्रिटनी आणि सॅमचे लग्न झाले. तर पोलिसांनी जेसनला अटक केली.