‘द कपिल शर्मा शो’ फेम कॉमेडियन सुगंधा म‍िश्रा आणि संकेत भोंसले या दोघांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. या नव्या जोडप्याला लग्नाच्या ९ दिवसांतच पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. लग्नात कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि तिचा पती संकेत भोसले दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्यासोबतच हॉटेलच्या मॅनेजरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कॉमेडियन सुगंधा मिश्रा हिचा विवाह २६ एप्रिल रोजी कॉमेडियन संकेत भोसले याच्यासोबत फगवाडा इथल्या क्लब कबाना या हॉटेलमध्ये पार पडला. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी येऊन पोहोचलेले सर्व वऱ्हाडी मंडळी २४ तासांच्या क्वारंटाईनमध्ये राहीले होते. यावेळी कोव्हिड नियमांप्रमाणे लग्न सोहळ्यात केवळ ४० जणांनाच परवानगी होती. परंतू कोव्हिड नियम पायदळी तुडवत कॉमेडियन सुगंधाच्या लग्नात १०० जण सामील झाले होते.

Sugandha mishra-sanket bhosale 2

तिच्या या विवाह सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वेगाने व्हायरल झाले. या व्हायरल व्हिडीओच्या आधारेच पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केलाय.

कॉमेडियन सुगंधा आणि संकेतच्या विवाह सोहळ्यात कोव्हिड नियमांचं तंतोतंत पालन केलं असल्याचा दावा तिच्या कुटूंबियांनी केलाय. बरेच नातेवाईक तर करोना परिस्थितीमूळे विवाह सोहळ्यात येऊच शकले नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुबीर सिंह यांनी सांगितलं, “जीटी रोड इथल्या क्लब कबाना इथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात परवानगीपेक्षा जास्त लोक एकत्र आल्यामुळेच कॉमेडियन सुगंधा मिश्रा, वर पक्ष आणि हॉटेल मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.”