Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: संपूर्ण देश ज्या दिवसाची आतुरतेने वाढ बघत होता, तो दिवस अखेर आज आला आहे. आज अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी दिग्गज कलाकार मंडळी अयोध्येला रवाना झाले आहे. दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी लेक राम चरणबरोबर अयोध्येला रवाना झाला आहे. पण रामनगरीत जाण्यापूर्वी चिरंजीवी आणि राम चरण यांच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेता चिरंजीवी आणि राम चरणचे व्हिडीओ त्यांच्या फॅन पेज आणि एंटरटेनमेंट पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओत, चिरंजीवी आणि राम चरणच्या चाहत्यांनी हैदराबादमधील घराबाहेर तुफान गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. तसेच चाहते रामाचे फोटो, हनुमानाची मुर्ती, गुलाब अशा भेटवस्तू राम चरणाला देताना दिसत आहेत. यावेळी अभिनेता भेटवस्तू म्हणून दिलेल्या रामाच्या फोटोला नतमस्तक होऊन स्वीकारताना पाहायला मिळत आहे. राम चरणच्या याच कृतीने पुन्हा एकदा चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.

हेही वाचा – “शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी…”, राम मंदिराबाबत प्राजक्ता माळीची पोस्ट; म्हणाली, “प्राणप्रतिष्ठा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चिरंजीवी आणि राम चरण यांनी अयोध्येला रवाना होताना ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी चिरंजीवी म्हणाला, “हा एक दुर्मिळ क्षण आहे. मला असं वाटतं, भगवान हनुमानाने मला वैयक्तिकरित्या आमंत्रित केलं आहे. मी खूप भाग्यवान आहे की, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मी साक्षीदार आहे.” तसंच राम चरण म्हणाला, “या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहिली जात होती. ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.”