सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद अजूनही सुरुच आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरुन आक्षेप घेतला. या वादाला राजकीय वळण मिळालं. अनेक राजकीय मंडळींनी यावर आपली प्रतिक्रिया मांडली. तर चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. “उर्फीला थोबडवेन” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. तसेच चित्रा वाघ यांच्या या धमकीमुळे हल्ला होण्याची भीती उर्फीने व्यक्त केली.

आणखी वाचा – Video : आकर्षक इंटेरियर, ऐसपैस जागा अन्…; कधीकाळी चाळीत राहणाऱ्या भाऊ कदमचं आलिशान घर पाहिलंत का?

आता उर्फीने या सगळ्या वादामुळे तिच्या कुटुंबियांची कशी अवस्था झाली आहे याबाबत खुलासा केला आहे. तिला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं उर्फीचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकारामुळे तिचे कुटुंबिय चिंतेत आहेत. उर्फीच्या सुरक्षिततेची चिंता तिच्या घरातील सदस्यांना सतावत आहेत.

काय म्हणाली उर्फी जावेद?

‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने म्हटलं की, “माझे कुटुंबिय माझ्या आयुष्यामध्ये डोकावून पाहत नाहीत. पण माझी आई धमक्या येत आहेत हे जेव्हा ऐकते तेव्हा खूप घाबरते. कारण धमक्या फक्त सोशल मीडियावरच नाही तर फोनवरही येतात.” उर्फीच्या आईला तिच्या लेकीची चिंता सतावत आहे.

आणखी वाचा – Video : दुबईमध्ये खरेदीला निघाला गौरव मोरे, दुकानामध्ये जाऊन काय घेतलं पाहा? व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याबाबत तक्रारीचं पत्र लिहित सुरक्षा पुरवण्याची मागणी उर्फीने केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे उर्फीने तक्रार केली. उर्फी व चित्रा वाघ यांच्यामधील वाद कधी संपणार? की हा वाद आणखीनच वाढत जाणार हे येणारा काळच सांगू शकेल.