सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांना बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागत आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ पासून ते रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ पर्यंत, प्रेक्षकांनी या चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या बॉयकॉट या ट्रेंडवर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी व्यक्त होत आहेत. आलिया भटने देखील ब्रम्हास्त्राच्या प्रमोशन दरम्यान बॉयकॉट बद्दल आपले मत व्यक्त केले होते, ‘मी आवडत नसेन तर माझे चित्रपट बघू नका’ असे वक्तव्य केले होते. लाइगर चित्रपटाचा अभिनेता विजय देवरकोंडाने देखील यावर आपले मत व्यक्त केल्याने त्याला देखील ट्रोल केले गेले होते. याचा परिणाम थेट चित्रपटावर झाला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.

बॉयकॉटवर हळूहळू बॉलिवूडमधील कलाकार व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेत्री टिस्का चोप्राने बॉयकॉटवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘मला वाटते कोणत्याही अभिनेत्यामध्ये विशेष असे काही नाही, आम्ही असे लोक आहोत जे फक्त आमचे काम करतो. आमच्या कामामध्ये इतर लोक देखील समाविष्ट असतात. आम्ही फक्त पडद्यावर दिसतो. पडद्यामागे अनेकजण काम करत असतात. चित्रपटाची जबाबदारी फक्त लेखक आणि निर्मात्यांपर्यंत नसून चित्रपट बनवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत असते. हीच जबाबदारी आमच्या डोक्यावर देखील असते’.

“बलात्कारासारख्या घटना… ” प्रसिद्ध दिग्दर्शकाने समाजातील ज्वलंत विषयावर केला खुलासा

टिस्का मुलाखतीत ती पुढे म्हणाली, ‘प्रेक्षकांशी असलेले नातेही महत्त्वाचे आहे. मला वाटते की ते मोठे आहेत. तेच आम्हाला घडवतात कारण त्यांच्याशिवाय आम्ही काहीच नाही. जर ते आमच्या चित्रपटांवर बहिष्कार घालत असतील तर नक्कीच हे विचार करण्यासारखे आहे. ते आम्हाला पाहण्यासाठी त्यांचा वेळ आणि पैसा खर्च करतात म्हणून मी त्यांना काय हवे आहे याचा आदर करते. जर त्यांना चित्रपट आवडला नाही तर ते बघणार नाहीत’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिस्का चोप्रा नुकतीच ‘जुग जुग जियो’ चित्रपटात दिसली होती. आता टिस्का ‘दहन’ नावाच्या भयपटात दिसणार आहे. डिस्ने हॉटस्टारवर येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या भयपटात तिच्याबरोबर सौरभ शुक्ला, रोहन जोशी, राजेश तैलंग सारखे प्रतिभावान कलाकार देखील प्रमुख भूमिकेत असतील. टिस्का चोप्रा अनेकवर्ष बॉलिवूड काम करत आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.