ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर याचे भारतप्रेम तर सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचेही त्याला वेड आहे. तो सतत या गाण्यांवर डान्स करत व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता वॉर्नर नाही तर त्याच्या मुलींनी सध्या चर्चेत असणारा चित्रपट ‘पुष्पा’मधील सामे या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ वॉर्नरने शेअर केला आहे.

डेविड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मुलींचा हा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याच्या तिन्ही मुली ‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिका मंदानाची स्टाइल करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या तिन्ही मुली खूप सुंदर दिसत आहेत. पण सगळ्यांचे लक्ष हे त्याच्या लहान मुलीने वेधले आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘आई-वडील सामी-सामीवर डान्स करण्याआधी मुलींना डान्स करायचा होता’, असे कॅप्शन त्याने दिले आहे.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

या आधी डेव्हिड वॉर्नरने पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर डान्स केला होता. त्याचा हा डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला होता. तर अल्लू अर्जुनने देखील यावर कमेंट करत त्याची स्तुती केली होती. डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

आणखी वाचा : “माझ्या भावांनी हिंदूशी लग्न केले”, मानहानीच्या दाव्यावर सलमानच्या वकीलांनी दिली उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.