दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले असल्याचे दिसत आहे. पण हे सीन शूट करताना अनेक अडचणींचा सामना करायाला लागल्याचे दीपिकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

सेटवर इंटिमेट सीन शूट करताना फार वेगळे वातावरण असते. गहराइयांमधील इंटिमेट सीन शूट करण्याविषयी दीपिका म्हणाली, ‘गहराइयां या चित्रपटात भूमिका साकारणे माझ्या फार कठीण होते. कारण पडद्यावर इंटिमेट होणे हे फार कठीण आणि आव्हानात्मक असते. जर दिग्दर्शक शकुनने सगळे नीट हाताळले नसते तर कदाचित हे शक्य झाले नसते. आपण याआधी भारतीय चित्रपटसृष्टीत जे पाहिले नाही ते या चित्रपटातील दृश्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. माझी भूमिका ही ‘बोल्ड’ नाही तर ‘रिअल’ आहे. मी यापूर्वी कधीही अशा पद्धतीची भूमिका केली नव्हती.’
आणखी वाचा : देवोलिनाने दिला बिचुकलेच्या पत्नीस भेटण्यास नकार, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा करत आहेत तर करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन आणि व्हायकॉम १८ या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.