बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हॉलीवूड पदार्पणावर शिक्कामोर्तब झाले आहे. हॉलीवूड अभिनेता व्हीन डिझेलसोबत ‘XXX’ चित्रपटाच्या सिरीजमध्ये दीपिका झळकणार असून, येत्या फेब्रुवारीत दीपिकाच्या या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. खुद्द चित्रपटाचा दिग्दर्शक डी.जे. कुरकओने ट्विटकरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘XXX’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू करण्यात येणार असून, बॉलीवूड स्टार दीपिका फेब्रुवारीपासून सेटवर चित्रीकरणाला उपस्थित असेल, असे दिग्दर्शकाने ट्विट केले आहे.
यापूर्वी दीपिकाचा व्हीन डिझेलसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून दीपिकाच्या हॉलीवूड पदार्पणाच्या चर्चेने जोर धरला होता. अखेर आज चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या ट्विटने शिक्कामोर्तब झाले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2016 रोजी प्रकाशित
दीपिकाचा हॉलीवूड प्रवेश फेब्रुवारीत, व्हीन डिझेलसोबत करणार चित्रीकरण
हॉलीवूड अभिनेता व्हीन डिझेलसोबत 'XXX' चित्रपटाच्या सिरीजमध्ये दीपिका झळकणार
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 06-01-2016 at 16:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone to start shooting for vin diesels xxx sequel