बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या धमाकेदार चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एका चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि साउथचा सुपरस्टार धनुष सुद्धा झळकणारेय. आज धनुष त्याचा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्ताने अक्षय कुमारने धनुषला आपल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या.

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून धनुषला शुभेच्छा दिल्या. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये धनुष आणि अभिनेत्री सारा अली खानसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटो शेअर करत त्याने आपल्या अनोख्या अंदाजात एक हटके कॅप्शन सुद्धा दिलीय. यात त्याने लिहिलंय, “तुझं नाव धनुष आहे. पण तुझं नाव तीर असं असायला हवं होतं. कारण तू तुझ्या टॅलेंटबाबतीत खूपच क्लिअर आहेस. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा धनुष. नेहमी चमकत राहा.”

अक्षय कुमारने शेअर केलेला हा त्याचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’च्या फोटोशूटमधला आहे. अक्षय कुमारसोबत त्याच्या या चित्रपटात धनुष आणि सारा अली खान हे सुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात देखील झालीय. या चित्रपटासाठी अक्कीला अवघ्या दोन आठवड्यांसाठी शूटिंग करायचं आहे .त्यासाठी त्याने तब्बल 27 कोटी रुपये घेतले आहेत.

आणखी वाचा: Birthday Special: पहिल्या भेटीतच ऐश्वर्याला आवडला होता धनुष; ‘या’ कारणामुळे करावं लागलं होतं लग्न

अभिनेता अक्षय कुमारची ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होतेय. तसंच त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे फॅन्स साउथ सुपरस्टार धनुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.

अभिनेता अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’, ‘राम सेतु’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘रक्षाबंधन’ सारखे चित्रपट लवकरच रिलीज होणार आहेत.