अभिनेते व अभिनेत्रींचे एअरपोर्टवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांच्या एअरपोर्ट लूकची खूप चर्चा होताना दिसते. एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण, त्याला ओळखणंही अवघड झालं आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी दाढी व केस वाढवले आहेत.

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म

या अभिनेत्याने कॅज्युअल पँट व हुडी घातली होती, तसेच डोळ्यांवर त्याने गॉगल लावला होता. त्याचे केस वाढलेले आहेत तसेच दाढीही वाढलेली दिसत आहे. त्याचे चाहते एअरपोर्टवर येऊन सेल्फी काढत आहेत. ‘विरल भयानी’ने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसणारा अभिनेता हा दक्षिणेतील सुपरस्टार धनुष आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, धनुषने स्वतःच काही दिवसांपूर्वी त्याचे फोटो शेअर केले होते. त्यात त्याचा हा नवीन लूक चाहत्यांना पाहायला मिळाला होता. धनुषला या नवीन लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे. पण, या लूकसह तो कोणत्या चित्रपटात दिसेल, याची त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.