बाहुबली सिनेमाचे दोन्ही भाग तुफान गाजले. सध्या तर बाहुबली २ सिनेमाचीच चर्चा सगळीकडे होत आहे. हा सिनेमा वारंवार पाहणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. एखाद्या बाहुबलीच्या कट्टर चाहत्याला या सिनेमातली दृश्य विचारली तर तो जशीच्या तशी सांगेल. पण तरीही अशी एक गोष्ट आहे ती बाहुबलीच्या कट्टर चाहत्यांच्याही लक्षात आली नसेल. या सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही या सिनेमात काम केले आहे. तुम्हाला विश्वास बसत नाहीये का? पण हे खरंय राजामौली यांनी बाहुबलीच्या पहिल्या भागात अभिनय केला आहे.

rajamaouli1

आता तुम्ही नक्की राजामौली यांनी नेमकी कोणती व्यक्तिरेखा साकारली याचा विचार करत असाल. पण तुमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तरही आम्हीच देणार आहोत. ही व्यक्तीरेखा बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागातली आहे. ओळखलंत का या माणसाला? अहो हेच आहेत राजामौली. राजामौली यांनी एका दारु विक्रेत्याची भूमिका बजावली होती. महिष्मती साम्राज्याचा सम्राट कोण ठरणार? हे ठरवण्यासाठी एका स्पर्धेअंतर्गत बाहुबली व भल्लालदेव दोघेही आपल्या राज्यापासून दूर यात्रेसाठी जातात. तेव्हा ते तावेर्ण नावाच्या जागी थांबतात आणि तेव्हा या पात्राचा समावेश आहे. खालील प्रोमोमध्ये राजामौली यांची झलक पाहायला मिळते.

rajamaouli

 

आतापर्यंत बाहुबलीने १२०० हून अधिक कमाई केली आहे. १००० कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा बाहुबली हा एकमेव सिनेमा आहे. आमिरा खानचा दंगल सिनेमा सध्या चीनमध्ये चांगली कमाई करत आहे. या सिनेमानेही ९०० कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येत्या काळात दंगलीही १००० कोटींची कमाई करणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसंच सलमान खानचा आगामी ट्युबलाइट हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.