scorecardresearch

फ्लॅशबॅक : ‘शक्ती’शाली अभिनय

‘शक्ती’च्या वेळी आलेला योग मुहूर्तापासूनच लक्षवेधी.

फ्लॅशबॅक : ‘शक्ती’शाली अभिनय
शक्तीचा निर्माता मुशिरसोबत दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन

dilip thakurदिलीपकुमारच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे त्याच्यासमोर वा सोबत कोणीही अभिनेता आला रे आला की अभिनयात कोण भारी ठरले याची चित्रपट विश्लेषकांपासून रसिकांपर्यंत भरभरून चर्चा रंगे. राज कपूर (अंदाज),  राजकुमार (पैगाम व सौदागर) आणि संजीवकुमार (संघर्ष व विधाता ) ही ठळक उदाहरणे. अमिताभ बच्चन म्हटल्यावर कथा कल्पना पटकथा संवाद यापासून सगळेच कसे जबरदस्त हवे. ‘शक्ती’च्या वेळी आलेला योग मुहूर्तापासूनच लक्षवेधी. हे आव्हान लिहिले सलिम जावेदने. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम योग. निर्मिती मुशिर रियाज यांची. ‘सफर’, ‘बैराग’ इ. चित्रपटांचा त्याना अनुभव. तर दिग्दर्शन रमेश सिप्पीचे. ‘शान’ नंतरचा त्याचा हा ‘शक्ती’. दिलीपकुमार अभिनयाचे विद्यापीठ. तर अमिताभ ही अभिनयाची शाळा. दोघेही सेटवर असताना अनामिक तणाव असल्याची चर्चा रंगली. दिलीप संथपणे काम करणारे तर अमिताभ वक्तशीर. एक बरे की पटकथेनुसार काम झाले. पोलीस अधिकारी कर्तव्यात कसूर न करता आपल्या गुन्हेगारी वळणावर गेलेल्या मुलाला कडक शिक्षा करतो. नात्यापेक्षा कर्तव्यदक्षता मोठी हे याचे कथासूत्र. राखीने अमिताभची आई साकारली. स्मिता पाटीलने प्रेयसी. तर अमरिश पुरी खलनायक. सगळे लक्ष अर्थात दोन बड्या अभिनय ‘शक्ती’मध्ये भारी कोण ठरतय याकडे. अमिताभने आपले अस्तित्व दाखवून तर दिले. परंतू  दिलीप कुमार आपण दिलीप कुमार आहोत याचा कोणत्याही फ्रेममध्ये विसर पडू देत नाही. अमिताभचे चाहते गप्प राहिले यात बरेच काही आले. ‘शोले’ (१९७५) व ‘शान’ (१९८०) हे ज्या मिनर्व्हात झळकले तेथेच १९८२ मधे ‘शक्ती’ झळकला. ‘बॅन्ड स्टॅन्ड’वरील दिलीप व अमिताभच्या तणावपूर्ण भेटीच्या दृश्यासाठी दोघांच्याही चाहत्यांनी ‘शक्ती’ पुन्हा पुन्हा पाहिला यात बरेच काही आले. आर. डी. बर्मनच्या संगीतामधील ‘जाने कैसे कब कहा’ हे आनंद बक्षीचे गीत आजही उपग्रह वाहिनीवर पाहताना दिलीप व अमिताभच्या या लढतीची आठवण येतेच… शक्ती एकदाच बनतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2016 at 01:05 IST

संबंधित बातम्या