बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. दिलीप कुमार ९८ वर्षांचे होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्बेत काहीशी नाजूक होती. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये एक अशी पोकळी निर्माण झालीय जी कधीच भरून निघणार नाही. दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांनी केलेल्या कामातून चाहत्यांच्या मनात ते कायम जिवंत असणार आहेत.

रूपेरी पडद्यावर कधी प्रेमाचे गीत गुणगुणत तर कधी प्रेमभंग झालेल्या प्रेमींचे दुःख व्यक्त करत दिलीप कुमार यांनी प्रत्येक गाण्यात आपल्या अनोख्या अंदाजाने चाहत्यांची मन जिंकली. मग ते ‘उडे जब जब जुल्फें तेरी’ असो किंवा मग ‘फिर मुझे दुनिया वालों शराबी ना समझो’. दिलीप कुमार यांच्या कित्येक गाण्यांनी आजही चार्टबस्टरमध्ये आपली एक खास जागा निर्माण केलीय. चला तर मग एक नजर टाकूयात दिलीप कुमार यांच्या ऑल-टाइम हिट गाण्यांवर….

उडे जब जब जुल्फें तेरी

‘नया दौर’ चित्रपटातील या गाण्यात दिलीप कुमार यांनी वैजयंतीमालासोबत अशी जादू पसरवलीय ज्याची नशा आजही प्रेक्षकांच्या मनावर चढत असते. अंताक्षरी असो किंवा मग भटकंती…दिलीप कुमार यांचं हे गाणं आजही लोक गुणगुणत असतात. प्रेमातली थोडी मस्ती आणि प्रमाणिकपणाच्या भावनेचं दिलीप कुमार यांचं हे गाणं आजही हिट गाण्यांच्या यादीत पाहतात.

 

नैना लड जाए तो मनवा मा कसब होइबे

‘गंगा जमुना’ चित्रपटातील या मेलोडी सॉंगमध्ये दिलीप कुमार यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. क्षेत्रीय अंदाज आणि भाषांमध्ये नैन ‘लड जइहे तो मन मा कसक होइबे करी’ या गाण्याचे बोल ४० ते ५० च्या दशकात केवळ शहरातच नव्हे तर गावांमध्ये ही गाणं ऐकलं जात होतं. आजही ही गाण्यातला गोडवा कायम आहे.

 

दिल तडप तडप के कह रहा है

दिलीप कुमार यांनी रूपेरी पडद्यावर वैजयंतीमालासोबत अनेकदा प्रेक्षकांना आश्चर्य करून सोडलेलं आहे. ‘दिल तडप तडप के कह रहा है’ या गाण्यात दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला या जोडीनं कमाल केलीय.

 

साला मैं तो साब बन गया

सायरा बानो सोबत ‘संगीता’ या चित्रपटातील गाण्यातील चार्म आजही लोकांना आवडतो. ‘साला मैं तो साब बन गया’ त्याचं एव्हरग्रीन हिट सॉंग आहे. यात मजेदार बोल असल्यामुळे हे गाणं लोकांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलंय. या गाण्यात दिलीप कुमार यांचा तितकाच मजेदार अभिनय सुद्धा पहायला मिळाला.

सुहाना सफर और ये मौसम हसीन

सुहाना सफर सारखं गाणं आजही हिंदी सिनेमांमध्ये खूप कमी पहायला मिळतं. ५० वे दशक असो किंवा मग २१ वं शतक…सुहाना सफर और ये मौसम हसीन हे अशा गाण्यांपैकी एक आहे जे कधीच जुनं होत नाही.

 

ये मेरा दीवानापन है

दिलीप कुमार आणि मीना कुमार यांना घेऊन तयार केलेलं हे गाणं आजच्या पिढीतील कोक स्टुडिओमध्ये गाजतंय. हे गाणं लोक एकांतात ऐकण्यासाठी पसंती देतात. या गाण्याचे बरेच रिमेक बनवण्यासाठी सुद्धा दिलीप कुमार यांच्या या गाण्याला पसंती देतात.

 

इमली का बूटा

‘सौदागर’ चित्रपटातल्या या गाण्यात घट्ट मैत्री दाखवण्यात आलीय. दिलीप कुमार यांनी या गाण्यात व्यक्तींच्या प्रत्येक भावनांना हुबेहुब आपल्या कलेमध्ये उतरवलंय. या गाण्यातली त्यांची राजकुमार यांच्यासोबतची मैत्री चाहत्यांना खूपच भावली होती.

 

मधुबन में राध‍िका नाचे

‘कोहिनूर’ चित्रपटातलं ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे आजही अनेक सांगतिक कार्यक्रमात एकदा तरी ऐकायलं मिळणारं गाणं आहे. संथ गतीने लयबद्द केलेलं हे मेलोडे सॉंग प्रत्येक गायकाचं आवडतं गाणं ठरलंय. घरातली आजी-आजोबा असो किंवा मग सुप्रसिद्ध गायक…. ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याने प्रत्येकाला प्रेमात पाडलंय.

 

ऐ मोहब्बत जिंदाबाद

‘मुघल इ आझम’ चित्रपटातलं असं एकही गाणं नाही जे लोकांना मनात बसलं नाही. मधुबालाचं ‘प्यार किया तो डरना क्या’ हे आणि दिलीप कुमारचं ‘ऐ मोहब्बत जिंदाबाद’ हे दोन्ही गाणे चित्रपटाइतकेच लोकप्रिय झाले होते.

मुझे दुनियावालों शराबी ना समझो

वैजयंतीमालासोबत केलेल्या या गाण्यात दिलीप कुमार यांनी दारूच्या नशेत असलेल्या एका प्रेमीची भूमिका साकारलेली आहे. या गाण्यात फक्त प्रेम करणाऱ्या प्रेमींसाठीच नव्हे तर मद्यपानाचे शौकीन असलेल्या मद्यप्रेमींसाठी हे गाणं एक निमित्त ठरलं. दिलीप कुमार यांचं हे गाणं सगळ्यात हिट गाण्यांपैकी एक आहे.

 

दिलीप कुमार यांच्या हिट गाण्यांची लिस्ट इथवरंच संपत नाही. त्यांनी फक्त रोमॅण्टिक नव्हे तर सॅड सॉंगमधून देखील आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आता दिलीप कुमार यांच्यानंतर त्यांचे हे गाणेच त्यांना चाहत्यांच्या मनात कायम जिवंत ठेवणार आहेत. दिलीप कुमार यांचे हे गाणं प्रेम, स्फुर्ती, मैत्री, तिरस्कार आणि दुःख या भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगाचे आहेत.