Dipika Kakar Shares Side Effects of Stage 2 Liver Cancer Treatment : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर वारंवार यूट्यूबवर ब्लॉग शेअर करते, जिथे ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स देते. काही महिन्यांपूर्वी या अभिनेत्रीवर यकृताच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया झाली होती. आता या अभिनेत्रीने एक ब्लॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की शस्त्रक्रियेनंतर तिने घेतलेल्या औषधांचे तिला गंभीर दुष्परिणाम जाणवत आहेत. ती घाबरली आहे आणि तिचे केस वेगाने गळत आहेत.
तिच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये दीपिका कक्कर म्हणते, “आज रविवार होता, तर मी आज संपूर्ण दिवसभर आराम केला. कारण मला खूप लो फिल होत होतं. हे सगळे उपचारचे दुष्परिणाम आहेत. माझे केस खूप गळत आहेत. हे खूपच भयानक आहे. खूप जास्त केस गळत होत आहेत. जेव्हा मी अंघोळ करून बाहेर येते, त्यानंतर १०-१५ मिनिटे मी गप्प असते. कोणाबरोबर बोलत नाही, कारण केस गळणं हे माझ्यासाठी भीतीदायक आहे. मी शोएबच्या ब्लॉगमधून आधीच माझ्या रिपोर्ट्सबद्दल सांगितलं आहे. ३ महिन्यांनंतर केलेले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.”
ऑगस्टच्या सुरुवातीला, दीपिकाने सांगितले होते की जेव्हा तिने टारगेटेड थेरपी सुरू केली, तेव्हा तिला दुष्परिणामांचा अनुभव आला. तिचे केस लगेच गळू लागले आणि तिच्या शरीरावर लाल चट्टेदेखील आले होते. अभिनेत्रीने तिच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, हे दुष्परिणाम फक्त १०% लोकांनाच होतात आणि ती त्यापैकी एक आहे.
मे महिन्यात दीपिकाला कर्करोग झाल्याचे निदान झाले
दीपिका कक्करला मे महिन्यात कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर त्याबद्दल पोस्ट करत लिहिले होते, “गेले काही आठवडे आमच्यासाठी खूप कठीण होते… मी पोटात वेदना होत असल्याची तक्रार करत रुग्णालयात गेले होते, परंतु नंतर मला माझ्या यकृतात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आढळला. जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तो स्टेज २ मॅलिग्नंट कॅन्सर होता.”
‘ससुराल सिमर का’फेम अभिनेत्री दीपिका कक्कर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय नायिका आहे. सध्या दीपिका तिच्या लिव्हर कॅन्सरमुळे चर्चेत आहे. जूनमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. १४ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. अभिनेत्रीचा पती शोएब सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून तिच्या हेल्थिविषयी अपडेट देत असतो.