शिवसेना खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)ने शुक्रवारी (१ जुलै २०२२) सुमारे १० तास चौकशी केली. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. याप्रकरणी राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी नुकतंच याबाबत अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक अभिजित पानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित पानसे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. खरं तर शाळेतच शिकलो होतो… मागे ED लागलं… तर तो भूतकाळात जातो ! अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यासोबत त्यांनी #गण्याहिंगोटे #सर्वज्ञानी असे दोन हॅशटॅगही पोस्ट केले आहेत.

“आता ‘राजी-नामा’ देतोय…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिजित पानसे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच याद्वारे त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही टीका केली आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टखाली अनेकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत. ED पेक्षा तुमचा रान बाजार बरा, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या पोस्टवर केली आहे. तर एकाने ED 360 डिग्री मधे वळायला लावते कोणालाही…, अशी कमेंट केली आहे.

दरम्यान अभिजित पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेबसीरिजनंतर आता अभिजित पानसे आणि चिन्मय मांडलेकर ही जोडी ‘राजी-नामा’ ही वेबसीरिज प्रदर्शित करणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘राजी-नामा’ वेबसिरीजची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक राजकीय सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.

“मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या ‘रानबाजार’ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director abhijit panse share facebook post about ed and recent politics nrp
First published on: 04-07-2022 at 08:19 IST