बॉयकॉट हा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरु असताना हिंदी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ हे बिग स्टार्सचे चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. हिंदी चित्रपटांचं हे बदलतं चित्र फारच निराशाजनक आहे. मात्र मराठी चित्रपटांनी चांगलाच वेग धरला आहे. ‘टाइमापास ३’, चंद्रमुखी, ‘धर्मवीर’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. तसेच ‘दगडी चाळ २’, ‘टकाटक २’ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

आणखी वाचा – काही वर्ष अफेअर, २५ वर्षांचा संसार अन्…; पडत्या काळात समीर चौगुलेला मिळाली पत्नीची साथ

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठीमधील आघाडीच्या टॉप अभिनेत्री दिसत आहेत. इतकंच नव्हे तर या अभिनेत्रींचा मराठमोळा लूक विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.

पाहा व्हिडीओ

‘बाईपण भारी देवा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मराठीमधील हा नवाकोरा स्त्री प्रधान चित्रपट असल्याचं दिसून येत आहे. “करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, जिओ स्टुडिओजची नववर्षाची खास भेट! प्रत्येक मैत्रिणीला नक्की सांगा, आपला सिनेमा येतोय. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ ६ जानेवारी २०२३ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात!” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : महादेवाचं दर्शन घेण्यासाठी शिखर शिंगणापूरला पोहोचली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर या सहा अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. आई, आजी, बायको, मुलगी, बहिण, सासू, मावशी, काकी, आत्या यांना सांगा त्यांचा सिनेमा येतोय असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. चित्रपटाचं हे मोशन पोस्टर पाहून ‘बाईपण भारी देवा’बाबात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.