मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. ते नेहमी विविध मुद्यांवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण अनेक बदल होताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. केदार शिंदे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्यक्तीपेक्षा विचार महत्वाचा, तो सांभाळतो, तोच खरा वारसदार…., असे केदार शिंदे यांनी ट्वीट करताना म्हटले आहे.
केदार शिंदेंनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ‘छुपे विरोधक..पाठीवर वार करणारे..’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘आजची राजसाहेबांची मुलखात कशी वाटलं?’ असा प्रश्न कमेंट करत विचारला आहे. “विचार महत्वाचा नक्कीच, पण “तो विचार” काळाच्या आणि अनुभवाच्या मोजपट्टीवर सतत मोजून त्याला नविन आकार नको का द्यायला ? विचाराचे एकसुरीपण त्याला irreverent बनवू शकते”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
केदार शिंदे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, तू तू.. मी..मी.. गेला उडत, गोपाळा रे गोपाळा अशी अनेक नाटक त्यांनी केले आहेत. त्यासोबतच हसा चकटफू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, साहेब बिबी आणि मी या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. त्यासोबच ऑन ड्युटी चोवीस तास, बकुळा नामदेव घोटाळे, अगं बाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.