‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार लवकरच विवाहबंधनात अडकले जाणार आहेत. येत्या १६ जुलै रोजी ते लग्न करणार असून ते दोघे ही त्या दिवसाची प्रतिक्षा आहे. राहुल वैद्य नुकताच ‘खतरों के खिलाडी ११’च शूटिंग संपवून भारतात परत आला आहे. लाग्नाच्या तयारीसाठी त्यांना फारसा वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे आता राहुल आणि दिशाच्या लग्नाची तयारी वेगात सुरु आहे. त्यांचे संगीत, बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरत होत आहेत. आता #dishul हा हॅशटॅग सध्या प्रचंड ट्रेंड होताना दिसून येत आहे .
राहुल आणि दिशाच्या लग्नाला फक्त काही दिवस राहिले आहेत. लवकरच हे दोघ लग्न बंधनात अडकणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत दिशाने या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
दिशाने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत लग्न आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टींसाठी ती किती उत्सुक असल्याचे तिने सांगितले. “लानासाठी मी खूप उत्सुक आहे. लग्नातले सगळे विधी, एक कपल, आणि एकंदरीत राहुल बरोबर नवीन आयुष्याची सुरवात करण्यासाठी आतुर आहे. हा दिवस माझ्या आयुष्यातील उत्तम आणि सुंदर दिवस असणार आहे.”
या पुढे बोलताना दिशाने संगीत समारोहमध्ये सोलो आणि कपल डान्स करणार असल्याचे देखील सांगितले. राहुल आणि दिशाने आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लग्न पत्रिका पोस्ट करून सांगीतली होती. त्यानंतर त्यांचे संगीत समारंभाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.