देशाच्या पंतप्रधानांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. यंदाच्या वर्षी लोक मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करताना दिसत आहेत. सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड पार्ट्यांची, एरव्ही कामात व्यस्त असणारे सेलिब्रेटी सध्या या पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत. तर दुसरीकडे गायक मंडळी आपल्या गायनातून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवाळीच एक गाणं पोस्ट केलं आहे. यावेळी कोणते हिंदी किंवा बंगाली गाणी नव्हे तर चक्क मराठी चित्रपटातील गाणे तिने गायले आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘मन मंदिरा’ हे गाणे तिने गायले आहे. या व्हिडीओ मध्ये तिचा मुलगादेखील दिसतो आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर फोटोग्राफर्स आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झाली धक्काबुकी, व्हिडीओ व्हायरल

आपल्या सुरेल आवाजाने श्रेया घोषाल प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. श्रेयाने २०१५ मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली. श्रेयाचा पती मुंबईतील एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहे. आज या दोघांना एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव देवयान असे ठेवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रेयाने अगदी लहानपणापासून गायन क्षेत्रात करियर करण्यास सुरवात केली होती. तिने लहानपणी झी सा रे ग म प कार्यक्रमात भाग घेतला. त्या कार्यक्रमात ती विजेती ठरली होती. वयाच्या ६ वर्षी तिने शास्त्रीय गाण्याचे शिक्षण घेण्यास सुरवात केली होती. आज तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. श्रेया मूळची बंगालची असून राजस्थान मधील कोटा शहराजवळील एका गावात तिचे बालपण गेले आहे.