खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे कधी राजकीय, सामाजिक तर कधी चित्रपटांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा बहुचर्चित ‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला. डॉ. अमोल कोल्हे यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अनेकदा ते त्यांच्या चाहत्यांच्या पोस्टवर कमेंटही करताना दिसतात. सध्या त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अमोल कोल्हे हे त्यांच्या मतदारसंघात कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे अनेकदा कौतुकही केले जाते. नुकतंच अमोल कोल्हे यांच्या चाहत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : “राजकीय रंग…” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या निर्मितीदरम्यान शरद पवारांनी अमोल कोल्हेंना दिला होता खास सल्ला

“अचानक भेट, आज मी मुलीसाठी स्टेशनरी मध्ये वह्या आणायला गेलो असता तिथे अभिनेता, खासदार डाँ. अमोल कोल्हे सर भेटले. आज लोकप्रिय अभिनेता खासदार असूनही मुलांच्या पुस्तके खरेदीसाठी स्वतः आले आणि माझी अचानक भेट झाली. आजच्या जगात अशी माणसं खुप कमी भेटतात. काही नगरसेवक,आमदार, खासदार यांना माज असतो”, असे त्यांनी या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे.

चाहत्याने केलेल्या या पोस्टला अमोल कोल्हेंनीही दाद दिली आहे. यावेळी त्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला आहे.

“आपल्या कौतुकाबद्दल धन्यवाद! कलाकार असो वा खासदार असो, वैयक्तिक जीवनात मुलगा,नवरा, भाऊ, बाप या भूमिका असतातच! “पद असताना माज नको आणि पद नसताना लाज नको” एवढी सोपी फिलॉसॉफी आहे माझी! परंतु तुमचं “काही” लोकप्रतिनिधींविषयी असलेलं मत निश्चित विचार करण्यासारखं आहे!”, असे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “खासदार अमोल कोल्हे यांचा…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल कोल्हेंची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. आमचा खासदार आमचा अभिमान, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने राजकारणी कसा असावा याची एक उत्तम आदर्श व्यक्ती, म्हणजे कलाकार, डॉक्टर,खासदार, श्री अमोल कोल्हे, असे कमेंट करत म्हटले आहे.