अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद आहुजा यांचा विवाह अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोनमचं लग्न ठरल्यापासून प्रत्येक दिवसाचे अपडेट समोर येत असतांनाच अवघ्या चार दिवसांवर पुन्हा एक नवी माहिती समोर आली आहे. लग्नकार्यात बहुधा वधू-वर यांची विशेष चर्चा रंगत असते मात्र सोनमचे लग्न थोडे हटके आहे. या लग्नसोहळ्यात तिच्याबरोबर तिचे व-हाडीही चर्चेचा विषय ठरणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील हेरिटेज हवेली येथे संपन्न होणा-या या लग्नसमारंभात उपस्थित पाहुण्यांसाठी एक विशेष थीम ठेवण्यात आली आहे. या थीमनुसार सोनमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहुण्यांना ड्रेस कोड देण्यात आला आहे. त्यामुळे ७ तारखेला होणा-या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावे लागणार आहेत. तर आठ तारखेला पारंपारिक रितीप्रमाणे सोनमचा विवाह संपन्न होणार आहे. यावेळी सोनम अनामिका खन्ना या डिझायनरने डिझाइन केलेला ड्रेस घालणार आहे. तर येणा-या पाहुण्यांनाही पारंपारिक वेशभूषा करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोनम- आनंदचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडणार यात कोणती शंका नाही.

वाचा : ‘राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार न मिळाल्यानं मला अत्यंत अपमानास्पद वाटलं’

विशेष म्हणजे विवाहसोहळा जरी पारंपारिक पद्धतीने पार पडणार असला तरी संध्याकाळी होणा-या रिसेप्शन पार्टींमध्ये पाहुण्यांना भारतीय किंवा पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालण्याची मुभा आहे. मात्र हे कपडे फॉर्मल स्वरुपात असावेत अशी विनंतीही करण्यात आली आहे. त्यामुळे सोनम आणि आनंद यांच्याप्रमाणेच त्यांचे व-हाडीही आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dress codes for guest in sonam kapoor and anand ahuja wedding
First published on: 04-05-2018 at 13:52 IST