सक्तवसुली संचलनालयाने (ED) २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरोधात मोठी कारवाई केली. ईडीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे जॅकलिनला मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांच्या खंडणीचे गंभीर आरोप झालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मस्कतला जाण्यासाठी निघालेली असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अडवण्यात आलं. तिच्याविरोधात ईडीने जारी केलेल्या लूक आऊट नोटीसमुळे ती भारताबाहेर कोठेही जाऊ शकणार नाहीये. तिने गेट नंबर ३ मधून सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी टर्मिनल २ सोडलं.

सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.

हेही वाचा : २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत जॅकलीन होती रिलेशनशिपमध्ये?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ‘मद्रास कॅफे’ फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed has issued lookout notice against actor jacqueline fernandez say sources pbs
First published on: 05-12-2021 at 22:36 IST