लोकप्रिय निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा नवा सीझन आज सुरु झाला आहे. कॉफी विथ करणच्या चौथ्या पर्वात अभिनेता इमरान हाश्मीने हजेरी लावली होती. तर यावेळी त्याच्यासोबत महेश भट्ट हे देखील आले होते. या एपिसोडमध्ये महेश भट्ट आणि इमरान हाश्मी यांनी करणच्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे दिली. यामध्ये इम्रानची काही उत्तरे खूपच रोचक होती.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

करणने इमरान हाश्मीशी त्याच्या चित्रपटांमधील किसींग सीनबद्दल देखील विचारले. इमरानने सांगितले की त्याचा आठवणीत राहिलेला किसींग सीन जॅकलिन फर्नांडिससोबत होता तर सर्वात वाईट किसींग सीन ‘मर्डर’ चित्रपटातील सह कलाकार मल्लिका शेरावतसोबत होता. इमरानने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत इंटीमेट सीन केले आहेत. याबद्दल बोलताना करणने इमरानला एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव विचारले जिच्यासोबत त्याने काम केले नाही आणि त्याला तिच्यासोबत इंटिमेट सीन करायचे होते, त्यावर त्याने लगेच दीपिका पदुकोणचे नाव घेतले.

आणखी वाचा : “ऋषीजी गेल्यानंतर तुम्ही खूप फिरत आहात”; नीतू कपूर यांच्या ‘या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

यानंतर करणने इम्रानला अभिषेक बच्चन आणि सैफ अली खान यांच्याकडून काय चोरायला आवडेल? असा प्रश्न विचारला. तेव्हा इमरानने सांगितले की, तो त्यांच्या पत्नी म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन आणि करीना कपूर खान यांची चोरेल.

आणखी वाचा : धनंजय मानेच्या नावाने मीम्सचं पेज चालवणाऱ्याची अशोक सराफांनी घेतली शाळा, फोटो शेअर करत; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमरान हाश्मी सगळ्यात शेवटी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ चित्रपटात दिसला होता. आता तो सलमान खान आणि कतरिना कैफच्या ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इमरान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो ‘सेल्फी’ चित्रपटातही काम करत आहे.