Entertainment News Updates, Celebrity News : ‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे ही नुकतंच विवाहबंधनात अडकली. हृताने तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत लगीनगाठ बांधली. सध्या त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांपाठोपाठ ईडीने कुंद्रावर मनी लाँर्डिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत रानबाजार या मराठी वेबसीरीजची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातील बोल्ड सीनमुळे ही सीरीज चर्चेत आली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.




प्रसिद्ध अभिनेता कमल हासन बऱ्याच मोठ्या काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. २०१८ मध्ये ते ‘विश्वरुमम’ चित्रपटात दिसले होते. त्यांचा हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्यांचा बहुचर्चित चित्रपट ‘विक्रम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. ज्यात कमल हासन यांचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे.
Cannes 2022 : हिना खानने लावला ग्लॅमरचा तडका; पाहा रेड कार्पेटवरील खास फोटो
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने देखील कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. या महोत्सवातील हिनाचे लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
हिना खानचे फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अभिनेत्री कंगना रणौतचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कंगना देवदर्शन करत आहे. यावरच आपण एक नजर टाकणार आहोत.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट ‘धाकड’ येत्या शुक्रवारी २० मे ला प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना रणौत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे. ट्विटरवर दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे चाहते कंगना आणि तिच्या चित्रपटाच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
पुण्यातल्या नाट्यसृष्टीचे माहेरघर असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाची अवस्था दयनीय झाली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने एक पोस्ट शेअर करत कलाकारांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर आता एका प्रसिद्ध गायकाने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.
ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच अभिनेत्री कंगना रणौत ही वाराणसीमध्ये दाखल झाली आहे. सध्या ती तिच्या आगामी धाकड या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी तिने या प्रकरणी भाष्य केले.
Photos: ‘तारक मेहता’ साकारण्यासाठी शैलेश लोढा घ्यायचे इतके मानधन; ‘कॉमेडी सर्कस’ मधून केली होती करिअरला सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘तारक मेहता’ हे पात्र अभिनेता शैलेश लोढा यांनी घराघरात पोहोचवले. परंतु १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर त्यांनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सध्या हिंदी चित्रपटांच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे देशभरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी विरूद्ध बॉलिवूड असा वाद सुरू आहे. पण बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. जे आज बॉलिवूड प्रसिद्ध कलाकारांमध्ये गणले जातात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात. बॉलिवूड कलाकारांनी देखील या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे. दीपिका पदुकोणपासून ते अगदी नवाजुद्दीन सिद्दीकीपर्यंतची मंडळी रेड कार्पेटवर अवतरली. आता ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मागच्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये पहिल्यांदा या दोघांनी सोशल मीडियावरून या नात्याची जाहीर कबुली दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही या वर्षाच्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे.
नुकतीच हृता दुर्गुळे विवाहबंधनात अडकली आहे. डिसेंबर महिन्यात हृताने प्रतीक शहाबरोबर साखरपुडा केला होता. आता हृता-प्रतीकने लग्न करत सगळ्यांनाच गोड बातमी दिली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Birthday Special : कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेला नवाजुद्दीन आहे करोडोंचा मालक; आलिशान घर आणि गाड्यांची किंमत माहितीये?
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेल्या नवाजुद्दीनकडे करोडोंची संपत्ती आहे. नवाजुद्दीनचं मुंबईत घर असून त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
Photos: 'साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर…'; पाहा हृता-प्रतीकच्या लग्नाचे खास फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे.
‘रानबाजार’ वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे. यात त्या दोघींनीही बोल्ड सीन दिले आहे. यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे. नुकतंच प्राजक्ता माळीने या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.
शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गौरी खानने नुकतंच शाहरुखच्या न आवडत्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान गौरीने हा खुलासा केला होता.