Entertainment News Updates 16 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान त्याच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेला दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू पान मसालाची जाहिरात केल्यानं सोशल मीडिया ट्रोल होताना दिसतोय. याशिवाय बॉलिवूड क्वीन कंगना रणौतनं पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाही आणि स्टार किड्सवर निशाणा साधत टीका केली आहे. स्टार किड्समुळेच बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नसल्याचं तिने म्हटलंय.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
Photos : जान्हवीचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत; फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ
अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो जान्हवीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका रुपेरी पडद्यावर अगदी उत्तमरित्या साकारतो. आपल्या अभिनयाच्या जोरावरच तो आजवर इथपर्यंत पोचला. सध्या तो ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजचं चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे.
Inside Photos: 'बेबी डॉल'च्या वाढदिवसाचे धमाकेदार सेलिब्रेशन
सनीने वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते.
Photos: 'या' एका कारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'धर्मवीर'चा शेवट पाहणं टाळलं
या चित्रपटाचा खास शो काल (१५ मे) रोजी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स मध्ये पार पडला.
अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केतकी चितळे हिला कळंबोली येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री मानसी नाईकने प्रतिक्रिया दिली आहे. केतकीच्या वर्तनावर मानसीने संताप व्यक्त केला आहे.
सध्या महाराष्ट्रात केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टचा मुद्दा बराच गाजताना दिसत आहे. केतकी चितळेनं तिच्या फेसबुक पेजवरून आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सविता मालपेकर आणि मानसी नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रुपेरी पडद्यावर पूजा हेगडेने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. आताही तिच्या हाती बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या पूजाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने सलमान खानचं ब्रेसलेट घातलं आहे.
बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात कंगना रणौत नेहमीच आवज उठवताना दिसली आहे. ती नेहमीच बॉलिवूडच्या स्टार किड्सवर निशाणा साधताना दिसते. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरुन आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं कंगना नेहमीच म्हणताना दिसते. आता पुन्हा एकदा तिने बॉलिवूड स्टार किड्सवर निशाणा साधताना त्यांची तुलना उकडलेल्या अंड्यांशी केली आहे.
दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूने काही दिवसांपूर्वीच त्याचा चित्रपट ‘मेजर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य ‘मी बॉलिवूडला परवडणार नाही’ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे बराच वाद झाला होता. आता नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन त्याला पान मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल ट्रोल केलं आहे.
मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहेत. इम्रान खाननं २०११ मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केलं होतं. मात्र २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमधील वादाची चर्चा झाली आणि आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.