बॉलिवूड गायिका नेहा कक्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय असलेली नेहा दररोज नवीन गाणी प्रेक्षकांसमोर सादर करत असते. नुकतेच नेहाचे एक नवीन गाणे रिलीज झाले आहे. नेहा ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणे ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेकनंतर सतत चर्चेत आहे. खरं तर, लोकांना या गाण्याचं नवीन व्हर्जन आवडलेलं नाही. सोशल मीडियावर नेहा कक्करला सतत्याने ट्रोल केलं जात आहे. अशात आता या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठकने पहिल्यांदा या रिमेक सॉन्गवर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत फाल्गुनी पाठकने हे गाणे खराब केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गाण्याच्या नवीन व्हर्जनमुळे त्याचा निरागसपणा संपून गेला आहे, असं तिने म्हटलं आहे. एवढेच नाही तर, जेव्हा या गाण्याचे नवीन व्हर्जन पहिल्यांदा ऐकले तेव्हा तिला जवळजवळ उलटी होणं बाकी राहिलं होतं असं तिने म्हटलं आहे. “हे ऐकल्यावर पहिली प्रतिक्रिया अजिबात चांगली नव्हती. मला उलट्या झाल्यासारखे वाटत होते.” असं फाल्गुनी पाठक म्हणाली आहे.

आणखी वाचा- फाल्गुनी पाठक नेहा कक्करला कोर्टात खेचणार? नव्या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादावर फाल्गुनीचं स्पष्टीकरण

फाल्गुनी पाठक पुढे म्हणाली, “नवीन गाण्याने मूळ गाण्यातला निरागसपणा नष्ट केला आहे, या गाण्यातील मूळ गाण्याचा व्हिडिओ आणि चित्रीकरणात जो निरागसपणा होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जर तुम्हाला तरुण पिढीच्या हृदयापर्यंत पोहोचायचे असेल तर तुम्ही गाण्याची लय बदलू शकता, पण ते अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे करू नका. गाण्याची मौलिकता बदलू नका. पण मला वाटते की याबाबत मी काहीही करण्याची गरज नाही. माझे चाहते या गाण्याविरोधात सातत्याने संताप व्यक्त करत आहेत. म्हणूनच मी फक्त त्यांच्या पोस्ट शेअर करत आहे. चाहते मला साथ देत असताना मी गप्प का बसावं.

आणखी वाचा- “बाबा रुग्णालयात असताना…” राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर मुलीची भावूक प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नुकतेच नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे ९० च्या दशकातील लोकप्रिया गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चा रिमेक आहे. नेहासह क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि अभिनेता प्रियांक शर्मा देखील म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले आहेत. नवीन व्हर्जन बॉलिवूड रिमिक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या तनिष्क बागचीने संगीतबद्ध केलं आहे. मात्र, हे गाणे समोर आल्यापासून नेहा कक्करला प्रचंड ट्रोल केले जात आहे. तिचं हे गाणं कोणालाच आवडलेलं नाही.