प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. मल्याळम टीव्ही मालिका ‘पवित्रम्’ मध्ये राधाची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री व नृत्यांगना नयना जोसन हिने तिचा बॉयफ्रेंड गोकुळशी लग्न केलं आहे. गोकुळ आहे डान्सर आहे. नयना व गोकुळ यांचा भव्य पारंपरिक विवाह सोहळा नुकताच पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

नयनाने कांजीवरम साडी आणि पारंपरिक दक्षिण भारतीय दागिन्यांमध्ये तिचा लूक पूर्ण केला होता, तर गोकुळने पारंपरिक दाक्षिणात्य पोशाख परिधान केला होता. नयना व गोकुळ यांच्या या लग्न समारंभाला दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि टेलिव्हिजन उद्योगातील सेलिब्रिटी उपस्थित होते. सेलिब्रिटी फक्त या दोघांच्या लग्नालाच उपस्थित नव्हते, तर आधीच्या सर्व समारंभांमध्ये होते. गोकुळ व नयना यांच्या ब्रायडल शॉवर व प्री वेडिंग फोटोशूटची जोरदार चर्चा होत आहे.

पाहा पोस्ट –

३३ वर्षांची नयना व गोकुळ मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी गेल्या वर्षी मे महिन्यात साखरपुडा केला होता. दोघांचं आंतरधर्मीय लग्न असल्याने आई-वडिलांची मनधरणी करायला वेळ लागला, असं नयनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

View this post on Instagram

A post shared by TAMARA WEDDING MOVIES (@tamaraweddingmovies)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नयनाने मनोरंजन क्षेत्रातील तिचा प्रवास बाल कलाकार म्हणून सुरू केला. त्यानंतर तिने विविध टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं. ‘डान्सिंग स्टार्स’ या रिअॅलिटी डान्स शोची ती विजेती ठरली. त्यानंतर तिला खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ती ‘पवित्रम्’ या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. नयना सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.