Japanese actress Miho Nakayama Death: जपानमधील प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका मिहो नाकायामा हिचा मृत्यू झाला आहे. ५४ वर्षीय अभिनेत्री टोक्यो येथील एबिसू भागातील तिच्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. ती ६ डिसेंबर २०२४ रोजी ओसाका येथे ख्रिसमस कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार होती. मात्र प्रकृतीचं कारण देत तिने कॉन्सर्ट रद्द केला होता. त्यानंतर ती घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली.

मिहो नाकायामा हिच्या एजन्सीने शुक्रवारी (६ डिसेंबर रोजी) एका निवेदन प्रसिद्ध करून तिच्या मृत्यूची माहिती दिली. “ही घटना अचानक घडल्याने आम्हाला धक्का बसला आहे,” असं निवेदनात म्हटलं आहे. मात्र मिहो हिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा – ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ फेम कॉमेडियन कबीर सिंगचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मिहो हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यासंदर्भात तपास सुरू आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहो कामावर आली नव्हती, त्यामुळे एका ओळखीच्या व्यक्तीने तिच्या घरी भेट दिली. तेव्हा ती घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली. त्यानंतर तिच्या मृत्यूची बातमी समजली.

हेही वाचा – प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिहो नाकायामा ही १९८० च्या दशकातील जपानमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. १९९५ साली आलेल्या ‘लव्ह लेटर’ या चित्रपटातील तिची भूमिका खूप गाजली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक पुरस्कारही मिळाले होते. मिहोला एक मुलगा असून तो तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर राहतो.