रविवारी नेपाळमध्ये मोठा विमान अपघात झाला. या विमानात ६८ प्रवाशांसह एकूण ७२ जण होते, त्यापैकी ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत नेपाळची प्रसिद्ध गायिका नीरा छंत्याल हिचाही मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा : लँडिंगच्या १० सेकंद आधी घडलं विपरीत, विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत

हे विमान काठमांडूहून पोखरा येथे जात होते. या विमानाने सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. परंतु हे विमान त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वीच त्याचा अपघात झाला. यति एअरलाइन्सच्या ATR-72 या विमानात ५ भारतीय आणि ४ क्रू सदस्यांसह ६८ प्रवासी होते. या अपघातामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात नीरा छंत्यालचाही समावेश आहे.

हेही वाचा : ‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिपोर्ट्सनुसार ती पोखरा येथे एका कॉन्सर्टमध्ये सहभागी होणार होती. नीरा हे नेपाळी संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होतं. तिच्या गाण्यांना यूट्यूबवर चांगलीच पसंती मिळायची. त्याचप्रमाणे सोशल मीडिया वरूनही ती तिची गाणी शेअर करायची. तिची गाणी नेपाळमध्ये लोकप्रिय होती. आता तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.