श्रुती कदम

आकर्षक राहणीमान आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या फळीतील कलाकारांच्या विशेषत: सारा अली खान, जान्हवी कपूर यांच्यासारख्या तरुण अभिनेत्रींच्या हरएक इन्स्टा पोस्टमध्ये दिसणारा माणूस म्हणजे ओरी.. हा ओरहान अवत्रामणी नावाचा आणि ओरी नावाने प्रसिद्ध असलेला माणूस आहे तरी कोण? काम काय करतो? आणि बॉलीवूडशी त्याचा इतका घरोबा असण्याचं काय कारण.. या प्रश्नाविषयी किमान गेले वर्षभर तरी चर्वितचर्वण सुरू आहे. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत हा ओरी पुन्हा इतका चर्चेत येण्यासाठी कारणीभूत ठरला तो करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोच्या आठव्या पर्वाचा सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यावर चित्रित झालेला भाग. या भागात करणने सारा आणि अनन्या दोघींनाही तुमच्याबरोबर सतत छायाचित्रांमध्ये दिसणारा हा ओरी कोण आहे? असा प्रश्न करणने विचारला होता. आणि या दोघींनाही तो एक चांगला मित्र आहे यापलीकडे काही सांगता आलं नाही.

Manthan Screening at Cannes 2024
प्रदर्शनानंतर ५० वर्षांनी ‘मंथन’चं Cannes मध्ये खास स्क्रीनिंग, ५ लाख शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेला चित्रपट!
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
Loksatta vyaktivedh sangeet Sivan Photographer Film director
व्यक्तिवेध: संगीत सिवन
Chief Minister Eknath Shindes taunts to Naresh Mhaske attempt to comfort BJP leaders
मुख्यमंत्र्यांच्या नरेश म्हस्केंना कानपिचक्या, भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
Venice Biennale, Venice, paintings,
डोळ्याला डोळा भिडवून पाहणं…
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?

सारा आणि अनन्याच्या उत्तरांमुळे या ओरी नावाच्या माणसाबद्दलची उत्सुकता नव्याने वाढली. समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्याचा फायदा घ्यायचा निर्णय ‘बिग बॉस’ने घेतला. खरं तर ओरीला बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून ‘वाइल्ड कार्ड एंट्री’ द्यायची असं ठरवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात ओरी केवळ दोन दिवसांकरता घरात राहिला, सलमानबरोबर चमकला आणि ज्या वेगात आत गेला त्याच वेगात बाहेरही आला. या ओरी प्रवेशाने बिग बॉसचा फायदा झाला की खुद्द ओरीची लोकप्रियता अंमळ अधिक वाढली हे गूढ उकललेलं नसलं तरी ओरीच्या या दूरचित्रवाहिनीवरील प्रवेशाचं नेमकं कारण विचारत त्याच्याशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता’ला मिळाली. ओरहान अवत्रामाणीने कोलंबिया विद्यापीठातून फाइन आर्ट्सचं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. फॅशन प्रभावक, गीतकार अशा विविध भूमिकांमधून कार्यरत असलेला ओरी स्वत:बद्दल बोलण्यापेक्षा त्याच्याबद्दल असलेली गूढता कायम ठेवण्यावर अधिक जोर देतो. त्यामुळे ‘बिग बॉस’ प्रवेशाबद्दल तो भरभरून बोलला.

हेही वाचा >>>तालमीच्या अंकाची रंगत

सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये जाणार.. ‘बिग बॉस १७’ मध्ये सहभागी होण्याची इच्छा का आणि कशी निर्माण झाली? या प्रश्नाचं उत्तर देताना ओरी म्हणाला ‘मी बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक नाही तर पाहुणा म्हणून सहभागी झालो होतो. मी टीव्ही पाहात नाही, त्यामुळे मला बिग बॉस हा रिअॅहलिटी शो आहे हे माहिती नव्हतं. ‘बिग बॉस’ म्हणजे सलमान खान एवढीच माझी धारणा होती. त्यामुळे जेव्हा मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आलं तेव्हा खरं तर मला सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये जायला मिळणार असा माझा समज झाला आणि मी होकार कळवला.’ काही दिवसांनी बिग बॉस हा एक स्पर्धात्मक प्रसिद्ध कार्यक्रम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ‘एकदा शोचं स्वरूप मला लक्षात आलं आणि ते मला आव्हानात्मक वाटलं. मला सतत काही तरी नवीन करत राहायला आवडतं. इथे ‘बिग बॉस’च्या घरात ३० तास बाहेरच्या जगाशी, आपल्या नातेवाईकांशी संपर्क तोडून राहणं, माझ्या सवयींपेक्षा वेगळं जीवन अनुभवणं हे माझ्यासाठी त्या वेळी आव्हानात्मक होतं. त्यामुळे बिग बॉसचा पाहुणचार स्वीकारला’ असं त्याने सांगितलं. ‘बिग बॉस’मध्ये एखादी आवडलेली गोष्ट आणि एखादी न आवडली गोष्ट काय होती? याबद्दल बोलताना ओरी म्हणाला, ‘एकमेकांमध्ये कितीही भांडणं झाली, घरातल्या सदस्यांनी एकमेकांना कितीही वाईट वागवलं, बोललं, त्यांच्यात स्पर्धा जिंकण्यासाठी चढाओढ सुरू असली तरीही त्या घरात रोज सगळे एकत्र राहतात. कलाकार मंडळींचा एक मोठा समूह त्या घरात एकत्र राहतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या चढ- उताराबद्दल एकमेकांशी बोलतात, नवीन गोष्टी शिकतात. हे सगळं पाहिल्यानंतर मला माझ्या महाविद्यालयीन दिवसांची आठवण झाली. वादविवाद करूनही त्यांचं एकत्र राहणं, आनंद साजरा करणं मला खूप भावलं.’

घर सोडताना वाईट वाटतं.. शोमध्ये सहभागी झाल्यापासून ३० तासांनी मी या घरातून निघून जाणार आहे हे त्याला माहिती होतं, मात्र अन्य स्पर्धकांना तोही एक स्पर्धक आहे असं भासवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. ‘मी त्यांच्यात स्पर्धक म्हणूनच वावरलो, पण सोहेल खान आणि अरबाज खान यांनी सगळय़ांना मी पाहुणा असल्याचं जाहीर करत माझ्या बाहेर जाण्याविषयी सांगितलं तेव्हा मलाच वाईट वाटलं. ते घर तिथे जाणाऱ्या लोकांना आपलंसं करतं. त्यामुळे घरातून बाहेर पडताना वाईट वाटतंच’ असं त्यानं सांगितलं.

‘हिंदूी चित्रपटात भूमिका करायची आहे’

हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का? याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘माझे खूप मित्रमैत्रिणी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून काम करतात. मी त्यांचं काम, त्यांची मेहनत पाहतो. मला रोज एवढा ताण घेणं, अभिनय करणं शक्य नाही.’ एखाद्या चित्रपटात छोटेखानी किंवा पाहुणा कलाकार म्हणून जायला आवडेल असंही त्यानं सांगितलं.