‘तुझं सिंदूर कुठे आहे…?’ फॅन्सने केला दिशा परमारला सवाल

इन्स्टाग्राम लाईव्हच्या वेळेस राहुल आणि दिशाला प्रश्न विचारला होता.

rahul-disha
Photo-Loksatta file

‘बिग बॉस १४’ फेम गायक राहुल वैद्यने १६ जुलै रोजी अभिनेत्री दिशा परमारशी लग्न केलं. सध्या हे जोडपं तुफान चर्चेत आहे. राहुल दिशा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतेच राहुलचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स झाले. या निमित्ताने राहुल आणि दिशाने एक इन्स्टग्राम लाईव्ह सेशन केलं होतं. लग्नानंतर दिशा आणि राहुलची चाहत्यांसोबत ही पहिलीच भेट. या लाईव्ह सेशनच्या दरम्यान बरेच फॅन्स दोघांना प्रश्न विचारताना दिसले. मात्र  काही फॅन्सच्या प्रश्नाने राहुल आणि दिशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

इन्स्टाग्राम लाईव्हच्या वेळेस राहुल आणि दिशा, फॅन्सने केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. या वेळेस एका फॅनने दिशा तुझ सिंदूर कुठे आहे? असा प्रश्न विचारला होता. फॅनने केलेल्या या प्रश्नामुळे दिशाला वाईट वाटलं आणि ती लाईव्ह  सेशन सोडून जाण्याच्या तयारीत होती. या वेळेस राहुलने परिस्थिती सांभाळत त्या फॅनला सांगितले “दिशाने सिंदूर नाही लावलं, ठीक आहे…….. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही काळजी करू नका.” तेव्हा अजुन एका फॅनने तुझी अंगठी कुठे आहे? असा प्रश्न विचारला. राहुलने शॉक होऊन दिशाला विचारले की, तु अंगठी पण नाही घातलीस…….अरे देवा…..राहुलच्या या प्रश्नावर दिशा प्रेमाने उत्तर देत म्हणाली अरे मी काम करत होतेना……..त्या वेळेस काढून ठेवली आणि मग घालायची राहून गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidyarkv)

या प्रश्ना नंतर दिशाने लगेचं कॅमेरा स्वत:कडे केला आणि फॅन्सना सांगितले की, “अरे आमच्या लग्नाला काहीच दिवस झाले आहेत रे……प्लिज आमच्यात भांडण लावू नका…” दिशाच्या या रिअॅक्शनवर राहुल मस्करीत म्हणाला “आज कालच्या बायका…..काय सांगू.!”

 

View this post on Instagram

 

A post shared by RAHUL VAIDYA RKV

राहुलने दिशाला नॅशनल टीव्हीवर प्रपोज केले होते त्यानंतर १६ जुलै रोजी दोघे लग्न बंधनात अडकले. त्याने त्याची लग्नाची पत्रिका शेअर केली होती. त्यात लिहीले होते  की, ”आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने तुमच्या सोबत हे क्षण शेअर करण्यात आनंद होत आहे. आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतोय की १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. आमच्या आयुष्यातील हा प्रेमाचा नवा अध्याय सुरु करताना आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” तसंच कोविड महामारीला लक्षात घेऊन कमी माणसांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करणार असल्याचे सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fans ask disha parmar where is your sindoor on which she reacted aad

ताज्या बातम्या