“लंबी है जिंदगी मिलेंगे फिरसे”, सिद्धार्थचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

सिद्धार्थ शुक्लाच्या फॅनने शेअर केलेला जुना व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल.

sidharth-shuklaa
Video-Siddharth Shukla fan

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधानामुळे सर्वांनाच खुप मोठा धक्का बसला आहे. कला विश्वातीला एक लोकप्रिय अभिनेता पडद्याआड गेला आहे. सोशल मीडियावर सगळे त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या फॅन्सना सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना करत आहेत. सगळे कलाकार आणि चाहते त्यांच्या सिद्धार्थ सोबत असलेल्या आठवणींचे  व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशात सिद्धार्थ शुक्लाचा एक जुना व्हिडिओ  एका फॅनने शेअर केला आहे जो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील सिद्धार्थच्या एका मेसेजने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा त्याच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असायचा त्यांनी केलेल्या मेसेजला  रिप्लाय  द्यायचा. सिद्धार्थच्या एका जुन्या आठवणीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याला सिद्धार्थ लवकर बरे व्हा असा मेसेज देत आहे. हा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला संबोधुन त्याने सांगितले, “आयुष्य खुप मोठं आहे आणि आपण नक्कीच भेटू” पुढे सिद्धार्थने माफी मागत त्या फॅनला निरोप दिला की, “मला माफ कर आपण भेटू नाही शकलो, मला आत्ता कळलं की तुझ्या बहिणीला बरं नव्हतं आणि मी प्रार्थना करतो की तुझी बहीण लवकरात लवकर बरी व्हावी आणि मला माहिती आहे की ती बरी होईल…. तु काळजी घे, आणि लंबी है जिंदगी मिलेंगे फिरसे ”

हा व्हिडिओ शेअर करत त्या फॅनने लिहिले की “भाई लंबी हैं जिंदगी मिलेंगे कभी हे वाक्य सारख आठवत आहे. कारण आता पुन्हा आपली भेट होणार नाही”. हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. सगळे हा व्हिडिओ शेअर करत त्यांचे दुख: व्यक्त करत आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by Mr. Bug (@mr.bug_youtuber)

सिद्धार्थच्या फॅनने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भावुक झाले आहेत ते कमेंट करत त्यांच दुख: व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले “आयुष्य खुप छोटं आहे” दूसरा युजरने लिहिले “कोणीही अंदाज लावू शकत नाही की तो किती काळं जगेल.” तर अजून एका युजरने लिहिले की “सिड प्लीज परत ये”.

सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला असून त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सिद्धार्थ बरोबरच्या असलेल्या आठवणी शेअर करत सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. ‘बिग बॉस 14’चा विजेता झाल्या नंतर सिद्धार्थचा चाहता वर्ग अजून मोठा झाला. त्याचे फॅन्स त्याच्या ग्रुपला प्रेमाने ‘सिडहार्ट’ म्हणतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fans breaks down after sharing old video of siddharth shukla wishing one fan good luck aad

ताज्या बातम्या