बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी  ‘मस्तीजादे’ चित्रपटातील एका दृश्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सनी आणि ‘मस्तीजादे’मधील कलाकारांविरोधात दिल्लीतील आदर्श पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘मस्तीजादे’ या चित्रपटातील एका दृश्यात सनी लिओनी आणि वीर दास  मंदिरात कंडोमचे प्रमोशन करताना दाखविण्यात आले आहे.  त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली असून, चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. ‘मस्तीजादे’ हा प्रौढ विनोदी चित्रपट असून २९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनी लिओनीने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती.
5fe1686d13d0f7e95bb9e5761e9ee6e7 f773696a96134296f6c2d95b3400c892