आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आता अडचणीत सापडली आहे. तिच्या विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्फी जावेद फॅशन आणि कपड्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावर अश्लीलता पसरवते असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. ११ डिसेंबरला तिच्याविरोधात एका वकिलाने तक्रार केली आहे. याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.

मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात वकील अली काशिफ खान देशमुख यांनी लिखित स्वरुपाचा अर्ज देत उर्फीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तिचे कपडे अनेकदा वादाचा मुद्दाही ठरतात. तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. पण याचा उर्फीवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी तर हिंदुस्तानी भाऊनेही उर्फीला धमकी दिली होती. ज्यानंतर उर्फीने त्याला उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा- Video : उर्फी जावेद चक्क साडी नेसून पोहोचली विमानतळावर, वाऱ्यामुळे पदर सरकला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याआधीही उर्फीच्या विरोधात दिल्लीच्या पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप उर्फीवर करण्यात आला होता. एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाय हाय ये मजबूरी’ या म्युझिक व्हिडीओमुळेही ती कायदेशीर अडचणीत सापडली होती. गाण्यात रिव्हिलिंग कपडे परिधान केल्याने तिला कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागला होता.