जे लोकं आपल्या सुखातच नाही पण दुखा:त सुद्धा साथ देतात त्यालाच खरी मैत्री म्हणतात. कलाक्षेत्रात मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेते नसीरुद्दिन शाह आणि दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची मैत्री. त्या दोघांचे असे बरेच किस्से आहेत. तुम्हाला माहिती आहे का ? ओम पुरी यांनी नसिरुद्दिन शाह यांचा जीव वाचवला होता.

नसीरुद्दिन शाह यांनी ‘And then one day: a memori’ या त्यांच्या आत्मकथेत या घटने बद्दल सांगितलं आहे. १९७७ रोजीचा हा किस्सा आहे. एका हॉटेलमध्ये ते दोघं बसले होते. नसीरुद्दिन यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे की, “भूमिका (१९७७) या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस ओम आणि मी हॉटेलमध्ये बसलो होतो. जसपाल नावाचा माझा मित्र होता, ज्याच्याशी मी जास्त बोलत नाही, तो मध्येच तिकडे आला. मी त्याला इग्नोर केले मात्र त्याची नजर माझ्याकडेच होती. तो माझ्या मागच्या टेबलावर जाऊन बसला. मला नंतर जाणवलं की कोणी तरी सुरीने माझ्या पाठीवर वार केला. मी पाठी मागे वळून बघणार इतक्यात ओम उठला आणि पुढचा हल्ला होण्यापासून मला वाचवले. मी बघितलं तर तो जसपालच होता (माझा जुना मित्र) ज्याने माझ्यावर हल्ला केला आहे. त्याच्या हातात रक्ताने माखलेली सुरी होती. ओम आणि दोन लोकं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते”. असे नसीरुद्दिन शाह यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नसीरुद्दिन शाह म्हणाले की, “त्या हॉटेलवाल्यांना पोलिस येई पर्यंत थांबायचे होते. मात्र जखम एवढी गंभीर होती की त्याला न जुमानता ओम मला रुग्णालायत घेऊन गेला आणि अशा पद्धतीने त्याने माझा जीव वाचवला.” ओम पुरी आणि नसिरुद्दिन शाह हे एफ.टी.आय.आय.चे विद्यार्थी असून त्यांनी ‘जाने भी दो यारों’, ‘अर्ध सत्य’ आणि मकबूल अश्या बऱ्याचं चित्रपटात एकत्र काम केले आहे.