scorecardresearch

बॉलिवूडचे टॉप १० सेल्फी

या सेल्फीशिवाय बॉलिवूडच्या टॉपची यादी पूर्ण होऊ शकत नाही

बॉलिवूडचे टॉप १० सेल्फी

सेल्फीचं क्रेझ कोणाला नाही. अगदी छोट्या मुलांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सगळेच सेल्फीमय झालेले दिसतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे सेल्फी काढणं आणि नंतर सोशल मीडियावर ते शेअर करण्याचं जणू त्यांना वेडच लागलं आहे. चला तर मग बॉलिवूडच्या महानायकापासून ते बादशहापर्यंत कोणकोणत्या कलाकारांच्या सेल्फीचे सर्वाधिक कौतुक झाले ते पाहू…

०१. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांनी घेतलेल्या या खास सेल्फीचे महत्त्व काही वेगळे आहे. या सेल्फीमध्ये जया बच्चन तर आहेतच शिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शर्मिला टागोरही दिसतायेत.

०२. आर्यन आणि सुहाना या आपल्या दोन मुलांसोबत शाहरुखने काढलेला सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता.

०३. ‘दबंग’ सलमान खान याच्या कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायला तर सारेच उत्सुक असतात. तो स्वतः कुटुंबवत्सल माणूस आहे याची साक्ष देणारा असा हा फोटो आहे. या फोटोत दोन्ही भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि त्याचे वडील सलीम खान दिसतायेत.

०४. शाहरुख खान आणि आमिर खान हे बॉलिवूडचे दोन सुपरस्टार जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सेल्फी तर बनतोच ना…

०५. अर्जुन कपूरच्या या सेल्फीचीही बरीच चर्चा झाली होती. २०१५ मध्ये इंडियन सुपर लीगच्या उदघाटन सोहळ्यावेळी सचिन तेंडुलकर, रजनीकांत, नीता अंबानी, ऐश्वर्या राय बच्चन आणि आलिया भट्ट यांच्यासोबत अर्जुनने हा सेल्फी काढलेला.

०६. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या चाहत्यांसोबत २०१५ मध्ये मोरक्को येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान हा सेल्फी काढलेला.

०७. खान आणि कपूर या दोन्ही कुटुंबांचे सैफ अली खान प्रतिनिधीत्व करतो. या सेल्फीमध्ये सैफसोबत करिना कपूर, करिश्मा कपूर आणि तिचा मुलगा दिसतोय.

०८. शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतच्या या सेल्फीचीही खूप चर्चा झाली होती.

०९. करण जोहर, एकता कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा हा सेल्फी पाहिला नाही तर मग काय पाहिले…

१०. या सेल्फीशिवाय तर बॉलिवूडच्या टॉप १० ची यादी पूर्णच होऊ शकत नाही. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा हा सेल्फी फारच बोलका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-08-2017 at 12:03 IST

संबंधित बातम्या