भारतात आता हॉलीवूड चित्रपटांना चांगलीच पसंती मिळू लागली आहे. ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ हा त्यापैकी एक चित्रपट. फास्ट अॅण्ड फ्युरिअस सिरीजमधील ‘फ्युरिअस ७’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
‘फ्युरिअस ७’ चित्रपटाची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. फ्युरिअस सिरीजमधील महत्त्वाच्या कलाकारांपैकी एक असलेल्या पॉल वॉकरचा हा शेवटचा चित्रपट आहे. ३० नोव्हेंबर २०१३मध्ये एका अपघातात पॉल वॉकरचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटातील इतर कलाकारांसाठीही हा चित्रपट खास आहे. पॉल वॉकरने ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ मालिकेतील सहापैकी पाच चित्रपटांत काम केले आहे. विन डिझेल आणि ड्वेन जॉनसन (द रॉक) यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘फ्युरिअस ७’ हा चित्रपट ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.