नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील डान्स करत असल्याची टीका तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गैरवर्तवनामुळे गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणीही करण्यात आली होती. तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

पुण्यातील शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे नुकताच गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातलेला पाहायला मिळाला. गौतमी स्टेजवर डान्स करत असताना मंचावरील एका तरुणाने तिच्या बाजूला येऊन फटाका लावण्याचा प्रयत्न केला. तरुणाचं कृत्य पाहून गौतमीने लगेच डान्स थांबवल्याने तेथील आयोजकांनी त्याला बाजूला केले.

हेही वाचा>> “नंगानाच आणि फॅशन…”, उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी दंगा केल्याने गौतमीने पुन्हा डान्स थांबवून आयोजकांना परिस्थिती लक्षात आणून दिल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> ‘वेड’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून रितेश देशमुख भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटनाही याआधी घडली होती. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी थेट स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही घडला होता. त्यामुळे गौतमी पाटीलचे कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या सर्व प्रकारावर गौतमीने मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.