नृत्यांगना गौतमी पाटील व तिच्या आईला वडिलांनी लहानपणी सोडून दिलं होतं, असं तिनेच एका मुलाखतीत सांगितलं होतं. ती फक्त आईबरोबर राहते, वडिलांशी काहीच संपर्क नाही, असंही ती म्हणाली होती. आता तिचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील माध्यमांसमोर आले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण मायलेकीला सोडलं नव्हतं, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – गौतमी पाटीलचं जन्म नाव वेगळंच; वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…

गौतमीचे वडील जवळपास १८-२० वर्षांपासून या मायलेकीपासून वेगळे राहत आहेत. “जवळपास २० वर्षांपासून मी त्यांच्यापासून वेगळा राहतोय. मी पुण्यात नोकरीला होतो. घरं असलं की लहानमोठी भांडणं होतातच. कौटुंबीक वादातून आम्ही विभक्त झालो. मी बायकोला बोललो होतो की आपलं घर आहे शेती आहे, पण ती म्हणाली की मी त्या घरात पाय ठेवणार नाही. माझे आई-वडील वारले, भाऊ वारला आता मी एकटाच राहतोय,” असं रविंद्र नेरपगारे पाटील म्हणाले.

हेही वाचा – गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच माध्यमांसमोर, लेकीच्या आडनावाच्या वादावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मी पुण्यात असताना दारू प्यायचो, त्यामुळे हे सर्व घडलं. मला अपराधी वाटतं, माझ्याकडून चूक झाली. पण मी त्यांना सोडलं नव्हतं. मी त्यांना सोडलं नाही, त्यांनीच मला सोडलं, त्यामुळे मी गावाकडे निघून आलो. माझं वय झालंय, त्यामुळे माझ्या मुलीने मला मानसिक आधार द्यावा. मी तिची भेट घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला मुलगा नाही, गौतमी माझी मुलगी आहे, त्यामुळे तिने मला खर्चासाठी पैसे द्यावे,” असंही ते म्हणाले.

गौतमीने तिच्या स्वतःच्या हिमतीवर नाव मिळवलंय, त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो. तिच्या आडनावाच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ती पाटील आहे, तर पाटीलच आडनाव लावणार. त्यामुळे तिने आडनाव बदलायचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami patil father ravindra nerpagare patil reaction on leaving wife and daughter alone hrc
First published on: 02-06-2023 at 19:25 IST