अभिनेत्री गीता बासरा आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांच्या घरी एका नवीन छकुलीचे स्वागत झाले आहे. या परीमुळे त्यांचे कुटुंब सध्या या छकुलीचे लाड करण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत बाबू, परी, शोना यांसारख्या अनेक नावं असणाऱ्या तिला आता एक पक्क नाव मिळालं आहे.
गीता बासराने सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली. याशिवाय मुलीच्यावतीने तिने सगळ्या शुभचिंतकांचे आभारही मानले. ज्यांनी माझ्या मुलीचे स्वागत केले आणि आशिर्वाद दिले त्या सगळ्यांचे मनःपुर्वक आभार. गीताने पुढे लिहिले हिनाया हीर प्लाहा हिच्याकडूनही थँक्यू. तिच्या या ट्विटवरुन हरभजन आणि गीताच्या मुलीचे नाव हिनाया हीर प्लाहा असे आहे हे कळून येते. गीताच्या फॉलोअर्सने तिच्या मुलीच्या नावाचेही स्वागत केलं. फॉलोअर्समध्ये तिच्या या नावाबद्दलची फारच उत्सुकता दिसून आली. पण या नावाचा नेमका अर्थ काय याबद्दलही अनेकांमध्ये कुतुहूल होते.
बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या घरी एका छोट्या परीचे आगमन झाले. हरभजन-गीताला कन्यारत्न झाल्याची बातमी कळताच त्यांच्यावर सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. यावर गीता बसराने सर्वांच्या शुभेच्छांसाठी ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. त्याचसोबत तिने आपल्या चिमुकल्या लेकीचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोत हरभजनच्या लेकीने आपल्या इवलुश्या हातात आईचे बोट पकडलेले दिसते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमाल आर खान याने हरभजन-गीताच्या आई-बाबा होण्यावरून खिल्ली उडवली होती. इतरांवर नेहमी टीका करण्यासाठी किंवा खिल्ली उडवण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कमार आर खान याने विचित्र ट्विट केले होते . काय परफेक्ट प्लॅनिंग आहे, असे त्याने ट्विटद्वारे म्हटले होते. कमाल आर खानने ट्विटमध्ये लिहिलेले की, हरभजन सिंगने गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला लग्न केले होते. त्याच्या घरी २८ जुलै २०१६ साली मुलीने जन्म घेतला. बरोबर नऊ महिन्यांनंतर तो बाबा झाला, याला म्हणतात खरी प्लॅनिंग.
HINAYA HEER PLAHA would like to thank you all for your lovely wishes in welcoming her into this world .. #ourlife #ourworld @harbhajan_singh
— Geeta Basra (@Geeta_Basra) September 2, 2016