बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच त्या दोघांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

रितेश आणि जिनिलियाने लेडिज वर्सेस जेन्टलमेंटच्या २ सीजनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जिनिलिया म्हणाली, जेव्हा त्यांच लग्न झालं. तेव्हा ती रोज सकाळी उठून सलवार-कमीझ परिधान करायची आणि दागिने घालायची. त्यानंतर तिला त्याचा कंटाळ आला. तर लग्नाच्या १ महिन्यानंतर ती रडली आणि रितेशला म्हणाली, ‘मी आता हे करू शकत नाही.’

जिनिलिया पुढे म्हणाली, “जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मला हे एक आदर्श वाटले होते. रोज सकाळी मी सलवार-कमीझ घालून यायचे आणि माझी चिडचिड व्हायची, की मला तयार व्हावे लागत आहे.”

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

पुढे रितेश म्हणाला, “तो बॉक्सर्स आणि टी-शर्ट घालून जेवणाच्या टेबलावर बसायचा, तर जेनेलिया पूर्णपणे सलवार कमीज आणि दागिन्यांमध्ये सजलेली असायची. त्याला असे वाटायचे की तिने कोणती तरी पूजा असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल त्यासाठी करत असेल. हे एक महिना सुरु होतं त्यानंतर जेव्हा जिनिलियाने त्याला सांगितलं तेव्हा त्याला कळलं की कोणती पूजा किंवा कार्यक्रम नाही आहे.”

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त म्हणाले…

पुढे जिनिलिया म्हणाली, “एक दिवस, मी रडले आणि म्हणाले, मी हे करू शकत नाही. तेव्हा रितेश गोंधळला आणि म्हणाला काय झालं? मी म्हणाली, मी रोज असे कपडे घालू शकत नाही. तेव्हा रितेश म्हणाला, मलाही आश्चर्य वाटतंय की तू रोज असे कपडे का घालतेस!”

आणखी वाचा : अच्छे दिन चले गये ; अमिताभ यांची ही पोस्ट पाहता नेटकरी म्हणाले मोदी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश आणि जिनिलिया ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.