बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : अग्निपथ योजनापासून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेचा वापर? कुणाल कामराची पोस्ट चर्चेत

जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलिया सगळ्यात आधी तिच्या रूमचा दरवाजा उघडताना दिसते. त्यानंतर ती लहान मुलासारखी बेडकडे धावत जाते आणि अचानक खाली पडते. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलिया म्हणाली, ‘आणखी कोणाला असं वाटते…’

आणखी वाचा : सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती घेणार घटस्फोट?

आणखी वाचा : रूट कॅनल करणे अभिनेत्रीला पडले महागात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातून जिनिलिया ही तब्बल १० वर्षांनी चित्रपटातून पदार्पण करत आहे. यासाठी तिने ‘वेड’ या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.