‘सीता और गीता’ हा चित्रपट १९७२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी, सर्वाचे लाडके धरमपाजी म्हणजेच धर्मेंद्र आणि संजीव कुमार हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पींनी केलंय. हेमा मालिनींचा डबल रोल असणारा हा चित्रपट त्यावेळी विशेष गाजलेला. आजच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आपण ‘सीता और गीता’ या चित्रपटाचे पडद्यामागील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.
गोष्ट पडद्यामागची भाग १०: का होते ‘या’ चित्रपटांना दोन मध्यांतर?
अशाच अनेक चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से आणि रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.