Govinda Wife Sunita Ahuja Dance Video on Viral Bijuria Song : ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. परंतु त्यातील ‘बिजुरिया’ हे गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर व्हिडीओ बनवले आहेत. आता मनीष पॉलनेदेखील अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांच्याबरोबर व्हिडीओ बनवला आहे.
मनीषने सुनीता यांच्याबरोबर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही ‘बिजुरिया’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये, मनीष पॉलने निळ्या रंगाचा पँट-शर्ट घातला आहे, जो त्याला खूप छान आणि स्टायलिश लूक देत आहे. सुनीता यांनी हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे.
या अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “चला सुरुवात करूया! सुनीता आहुजा, व्वा! ‘बिजुरिया’.” या पोस्टवर वरुण धवनने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “माझी सर्वांत प्रिय आणि सर्वांत आवडती व्यक्ती, ज्यांनी लहानपणापासून मला नेहमीच साथ दिली आहे, ती सुनीता आंटी आहे. सुनीता आंटी तुम्हाला खूप खूप प्रेम!”. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “सुनीता मामी एक नंबर”, “नंबर वन डान्स”, “सुनीताजी कलाकार आहेत” “तुम्ही गोविंदापेक्षा चांगले डान्सर आहात.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
‘बिजुरिया’ हे गाणे ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटातील आहे. सोनू निगम आणि असीस कौर यांच्या आवाजातील या गाण्याचे संगीत तनिष्क बागची आणि रवी पवार यांनी दिले आहे. या गाण्याचे बोलखील सोनू निगम आणि तनिष्क बागची यांनी लिहिले आहेत.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हे गाणे सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर रील तयार करून ट्रेंडमध्ये सामील होत आहेत. यापूर्वी जान्हवी, ईशान, विशाल, मनीष पॉल आणि अंगद नेगीसह अनेक सेलिब्रिटींनी याचे व्हिडीओ बनवले आहेत.
मनोरंजक गोष्ट म्हणजे, ‘बिजुरिया’ हे गाणे १९९९ मध्ये प्रदर्शित झाले होते. सोनू निगमच्या ‘मौसम’ या अल्बममधील हे एक सुपरहिट गाणे होते, जे सोनूने स्वतः गायले आणि लिहिले होते. संगीत रवी पवार यांनी दिले होते. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट शशांक खेतान यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. आणि धर्मा प्रॉडक्शन्स निर्माते आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.