गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत. लता दीदी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्या अनेकदा जुने फोटो शेअर करत भूतकाळातील आठवणींना उजाळा देत असतात. लता दीदींनी नुकताच त्यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो खूप खास असल्याचं सांगत त्यांनी या फोटोशी जोडलेली आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

लता दीदींनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या पहिल्या क्लासिकल परफॉर्मन्सच्या दरम्यानचा आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत या फोटोसोबत असलेली आठवण सांगत कॅप्शन दिले,” नमस्कार आज ९ सप्टेंबर, १९३८ साली याच दिवशी सोलापूर येथील नूतन सांगित नाट्यगृहात माझ्या वडिलांसोबत मी पहिल्यांदा नाट्य सांगित आणि शास्त्रिय सांगिताचा कार्यक्रम केला होता, यावेळीस मी राग खंबावती गायले होते, त्यावेळेसचा हा फोटो आहे. मला अजूनही लक्षात आहे की माझं गाणं झाल्यावर वडील रंगमंच्यावर आले आणि त्यांनी गायला सुरूवात केली आणि मी तिकडे बसल्या बसल्या त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून  झोपून गेले. त्या कार्यक्रमच्या दरम्यानचा हा फोटो आहे.”

दीदींनी शेअर केलेला फोटो त्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देत असल्याचे या कॅप्शन कडे पहुन कळत आहे. या फोटोत लता दीदींनी दोन वेण्या बांधल्याचं दिसतंय. याआधी त्यांनी हा फोटो जेव्हा त्यांना पहिल्यांदा सापडला तेव्हा शेअर केला होता. त्यावेळेस त्यांनी “आज आमचे परिचीत उपेंद्र चिंचोरे यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स नऊ सप्टेंबर १९८३ मध्ये सोलापूरमध्ये सादर केला होता. तेव्हा प्रसिद्धीसाठी हा फोटो काढण्यात आला होता. विश्वास होत नाहीय कि ८३ वर्ष झाली गाणं गातेय.” असे कॅप्शन दिले होते.