भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत हरभजन चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच हरभजनने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण यावेळी फक्त हरभजन नाही तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान देखील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरभजनने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला सैफ अली खा दिसत आहे. हरभजनने दोन व्हिडीओ एकत्र करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सैफची माचो या ब्रॅंडची जाहिरात आहे. या जाहिरातीत सैफ माचो बोलतो आणि त्यावर हरभजन संतापून तू माचो असं म्हणतो. सध्या हा मीम व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का

आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video

हरभजन सिंगने त्‍याच्‍या कार्यकाळात भारतासाठी २ विश्‍वचषक जिंकले होते. तो २००७ मध्‍ये टी-20 विश्‍वचषक जिंकणार्‍या संघाचा आणि २०११मध्‍ये एकदिवसीय विश्‍वचषक जिंकणार्‍या संघात होता. याशिवाय हरभजनने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh shares a funny video on sif ali khan macho ad dcp
First published on: 17-03-2022 at 19:22 IST