छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या जोडीनं चाहत्यांना सुखद धक्का दिला खरा पण राणादा म्हणजे हार्दिक जोशीनं २ वर्षांपूर्वीच अक्षया देवधरसोबतच्या नात्याचे संकेत एका सोशल मीडिया पोस्टमधून दिले होते. सध्या त्याची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर हार्दिकनं दोन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०१९ मध्ये केलेली पोस्ट व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये हार्दिकनं अक्षयासोबतचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याला हटके कॅप्शनही दिलं होतं. त्यानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘पडद्यावरची सोज्वळ केमिस्ट्री नि पडद्यामागची निखळ मैत्री… याच्याही जरा पल्याडच आहे आमचं स्ट्रॉन्ग बाँडिंग..’ या पोस्टमधून हार्दिकनं अप्रत्यक्षपणे त्यांच्या नात्याची कबुलीच दिली होती असं बोललं जातंय. आता त्याची हीच पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा- राज ठाकरेंच्या समर्थनाची पोस्ट प्राजक्ता माळीच्या अडचणी वाढवणार? रिपब्लिकन पार्टीने केली कारवाईची मागणी

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील या जोडीला त्यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण पुढे जाऊन हे दोघं लग्न करतील याची कल्पना चाहत्यांना अजिबात नव्हती. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. मात्र राणादानं या नात्याचे संकेत पूर्वीच दिले होते अशी चर्चा आता ही जुनी पोस्ट व्हायरल झाल्यावर रंगताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video : हातात हात घालून एंट्री ते कपल डान्स, ‘असा’ पार पडला राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अगदी मराठी इंडस्ट्रीतील कलाकार ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी या दोघांनी पुढील सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.