मोठ्या ब्रेकनंतर बॉलिवूडटचा मिस्टर परफेक्शनिस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झालाय. या व्हिडीओत आमिर खान आणि एली अवरामचा रोमांस पाहायला मिळतोय. हा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.
अभिनेत्री एली अवरामने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर शेअर केलाय. यात एलीचा हॉट लूक पाहायला मिळतोय. तर आमिरचा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करताना दिसतोय. मोठ्या ब्रेकनंतर आमिर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यातच बऱ्याच काळानंतर आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळाल्याने चाहत्यांकडून त्याच्या या लूकला मोठी पसंती मिळतेय. या गाण्यातील आमिर खानचा लूक त्याने स्वत: सुचवला आहे. आमिर खान त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये सामिल होतं. वेगवेगळ्या कल्पना सूचवत असतो. या गाण्यासाठी देखील सेफी फॉर्मल लूक असावा असं त्यानं दिग्दर्शकाला सुचवलं होतं.
View this post on Instagram
एलीने गाण्याचा टीझर शेअर करत एक हटके कॅप्शन दिलंय. “Ouchhh.. यंदाच्या मार्चमध्ये गरमी असणार आहे. 10 मार्चला मजा लुटण्यासाठी तयार रहा!” असं कॅफ्शन एलीने दिलंय. 10 मार्चला ‘हरफनमौला’ हे गाणं रिलीज होणार आहे.
आमिर खान सध्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर लालसिंग चड्ढा यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.