scorecardresearch

सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? पोस्ट शेअर करत म्हणाली…

सोनाक्षी सिन्हाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

sonakshi sinha, sonakshi sinha engaged,
सोनाक्षी सिन्हाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. या सगळ्यात आता सोनाक्षीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर आता सोनाक्षीचा साखरपुडा झाला का असा प्रश्न नेटकरी करत आहेत.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सोनाक्षी तिची अंगठी दाखवत आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने एका व्यक्तीचा हात पकडला आहे. सोनाक्षीने डेनिम टॉप परिधान केलं आहे. हे फोटो शेअर करत “माझ्यासाठी हा दिवस खास आहे!!! माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक पूर्ण होत आहे… आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही…हे इतकं सोपं होतं यावर माझा विश्वास बसत नाही,” असे कॅप्शन सोनाक्षीने दिले आहे.

आणखी वाचा : चित्रपटात मेकअप न करण्याऱ्या ‘या’ अभिनेत्रीने धुडकावले चक्क २ कोटींचे मानधन

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

आणखी वाचा : मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद

दरम्यान, या आधी सोनाक्षी आणि अभिनेता जहीर इक्बालसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण ते रिलेशनशिपमध्ये नाहीत याचा खुलासा जहीरने केला होता. करिअरबद्दल बोलायचं तर जहीरनं ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर सोनाक्षीनं २०१० साली सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. जहीरच्या कामाबद्दल बोलायचं तर, आगामी काळात त्याचा दुसरा चित्रपट ‘डबल एक्सएल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय त्याची सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Has sonakshi sinha got engaged flaunts her huge diamond ring with her mystery man dcp