१ मे रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एक नवा वाद सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली होती असा उल्लेख राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला होता. आता सोशल मीडियावर हा नवा वाद सुरु झाला आहे. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. या सगळ्यात लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेने ही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमंतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक फोटो आहे. त्या फोटोवर “छत्रपती शिवरायांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपुरुष” असे लिहिले आहे. तर हा फोटो शेअर करत “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले” असे कॅप्शन त्याने दिले आहे. अनेक लोक हेमंतची बाजू घेत आहेत तर काही त्याला ट्रोल करत आहेत.

आणखी वाचा : “वा राजसाहेब वा, बऱ्याच काळाने…”, राज ठाकरेंच्या भाषणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते राज ठाकरे

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.

आणखी वाचा : “…म्हणून माझ्या मुलांचे खान हे आडनाव बदलले”, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे वक्तव्य चर्चेत

तर राज ठाकरेंच्या भाषणानंतर छगन भुजबळ म्हणाले होते की “राज ठाकरे यांचे भाषण ऐकल्यास असे वाटायला लागते की, ही सभा फक्त शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी आणि टिळक, बाबासाहेब पुरंदरे यांचे गुणगान गाण्यासाठी होती का? राज ठाकरे सांगतात तशी वस्तुस्थिती नाही. ३ एप्रिल १६८० ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली तेव्हा लोकमान्य टिळक फक्त १३ वर्षांचे होते”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome mahatma jyotiba phule raj thackeray chhatrapati shivaji maharaj lokmanya tilak dcp
First published on: 03-05-2022 at 11:09 IST